भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आज फैसला? शिवसेना व धनुष्यबाण कोणाचा? सत्तासंघर्षावर आज सुनावणी,सत्तानाट्य निर्णयाक टप्प्यावर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेना कुणाची? या एका प्रश्नाभोवती राज्यातील सत्तानाट्य आता निर्णयाक टप्प्यावर पोहोचले आहे. आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

आज सकाळी साडे दहा वाजता कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती.

त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातलं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेलं तर त्याचा परिणाम ही केस लांबण्यातही होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते.

एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार असताना, शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार? या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हं कोणत्या गटाचे आहे, यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्रे सादर केली आहेत.

आतापर्यंत कुणी किती कागदपत्रं सादर केली?शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यप्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)प्राथमिक सदस्य 20 लाख​एकूण कागदपत्र – 23 लाख 182बाळासाहेबांची शिवसेनाखासदार – 13आमदार – 40संघटनात्मक प्रतिनिधी – 711स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी – 2 हजार 46प्राथमिक सदस्य – 4 लाख 48 हजार 318शिवसेना राज्यप्रमुख – 11एकूण कागदपत्र – 4 लाख 51 हजार 139

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!