भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्रराष्ट्रीय

सुस्तावलेल्या सोने-चांदीत युद्धाने चैतन्य भरले , पुन्हा भाव कडाडले

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। इस्त्राईल-हमास युद्धाने मध्य-पूर्वेतील परिस्थिती बिघडवली आहे. या प्रदेशातील अशांततेमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचा परिणाम दिसून येत आहे. व्यापारीदृष्टीने मध्यपूर्व हा महत्वाचा भाग आहे. गेल्या 19 महिन्यांपासून युक्रेन-रशिया युद्धाचे जग परिणाम भोगत असताना आता या नवीन युद्धाने अनेक वस्तूंच्या किंमती भडकण्याची भीती वाढली. आयातीवर अधिक अवलंबून असणाऱ्या देशांना त्याचा सर्वात फटका बसेल. देशातील अनेक बँकांनी दोन वर्षांपासून सोन्याचा त्यामुळेच साठा करण्यास सुरुवात केली आहे. सुस्तावलेल्या सोने-चांदीत या युद्धाने चैतन्य भरले आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी उचल खाल्ली आहे. किंमती अशा भडकल्या आहेत.

सोन्याच्या किंमती भडकल्या
गुडरिटर्न्सनुसार, शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सोन्याने एकाएकी आघाडी घेतली. इस्त्राईल-हमास युद्धाचा हा परिणाम होता. त्यादिवशी किंमतीत 70 रुपयांची वाढ झाली. शनिवारी 310 रुपये, 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची, 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी भाव वाढला. तर 10 ऑक्टोबर रोजी किंमती 330 रुपयांनी भडकल्या. या चार दिवासात 1,300 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,680 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

सोन्या पाठोपाठ चांदीची मोठी झेप
सप्टेंबर महिन्यात चांदीत मोठी पडझड झाली होती. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच घसरणीने झाली. पण 7 ऑक्टोबर रोजी चित्र पालटले. युद्धानंतर चांदी लकलकली. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. 10 ऑक्टोबर रोजी मोठा बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,479 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,249 रुपये, 22 कॅरेट सोने 52651 रुपये, 18 कॅरेट 43,109 रुपये, 14 कॅरेट सोने 33,625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 68,583 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!