राज्यात राजकीय भूकंप होणार ?तारीख ठरली? फटका कोणत्या पक्षाला बसणार?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज सकाळी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे नाश्ताही केला. त्यामुळे आशिष देशमुख भाजपमध्ये येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं आशिष देशमुख यांनी
म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र, बाजार समितीच्या निवडणुकानंतर भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं .
कधी प्रवेश होणार याची डेडलाईनच बावनकुळे यांनी सांगून टाकल्याने पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार का? भूकंम्प झाला तर त्याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपमध्ये कोण येणार? कोणत्या पक्षातून येणार? हे बावनकुळे यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.