भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

” या ” माजी खासदार व शिवसेना नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, सेनेत हकालपट्टीचं सत्र

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. शिवसेनेतून बंडखोर एकनाथ शिंदे गटानं वेगळीवाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेनेनं बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षापासून दूर करण्याचं सत्र सुरू केलंय.

शिंदेंना शुभेच्छा दिल्यानंतर कारवाई
शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.

का कारवाई करण्यात आली?
एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे.

शिवसेनेला गळती, शिंदे गट वाढतोय!
राज्यात एकीकडे शिवसेनेतून वेगळी वाट पकडलेला शिंदे गट वाढत असून दुसरीकडे शिवसेनेत गळतीचं सत्र सुरू झालंय. शिवसेनेत आधी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात हकालपट्टी केल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्यानं मोठा शिरुर मतदारसंघात आता काय होणार, आढळराव पाटील यांचे समर्थकही त्यांच्यासोबत जाणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.

शिवसेनेत हकालपट्टीचं सत्र
शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटानं वेगळं वळण घेतल्यानं सेनेत मोठी फूट पडली आहे. दरम्यान, यामुळे शिवसेनेला फटका बसत असून एकीकडे हकालपट्टी सुरू आहे. तर दुसरीकडे समर्थ शिंदे गटात सामील होत आहे. यामुळे ही फूट वाढतच जात असल्याचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!