भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये “गोमाता अधिभार” लावण्याचा “या” सरकारचा निर्णय

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे १० रुपये गोमाता अधिभार (Cow cess) लावण्याचा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणांचा पाऊस करण्यात आला.

यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली ती गोमाता अधिभार ही घोषणा… राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रति बॉटल दहा रुपये गोमाता अधिभार लावल्यामुळे राज्य सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आता दारु महागणार आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केला. या अर्थसंकल्पामुळे राज्याला नवीन दिशा मिळेल, असे सुक्खू म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!