यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचं किरण घेऊन येणारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ‘देशातील अर्थव्यवस्थेची सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचं किरण घेऊन येणारा असेल. आज देशासाठी गौरवाचा दिवस आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावण्यापूर्वी सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय आजपासून सुरुवात होत आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस असून, राष्ट्रपतींचे अभिभाषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचे प्रयत्न असतील. देशातील अर्थव्यवस्थेची सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचं किरण घेऊन येणार आहे. आज देशासाठी गौरवाचा दिवस आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पहिल्यांदाच संयुक्त सदनाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचे भाषण म्हणजे भारताच्या संविधानाचा गौरव आहे. भारताच्या संसदीय प्रणालीचा गौरव आहे”, असे त्यांनी सांगितले.
“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पहिल्यांदाच संयुक्त सदनाला संबोधित करणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अभिभाषाणावेळी सर्व सदस्य त्यांचा सन्मान करतात. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार केले जाते. ही एक परंपरा असून गेल्या अनेक वर्षांपासून संसदेमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपती आणि अर्थमंत्री या दोन्ही महिला असल्याचा अभिमान आहे. आज देशात नारीशक्तीचा सन्मान करण्याची संधी आहे”, असेही पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सांगितले.