गुंगीचे औषध देऊन मुला सोबत मुलीचे विवस्त्र व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हे खरंय मावशी म्हणजे दुसरी आईच, मात्र,मावशीने नात्यातील सर्व सीमा पार केल्या याच आईसमान मावशीने आपल्या बहिणीच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,गोंदिया जिल्ह्यातील मुलगी भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात मार्च 2021 मध्ये तिच्या आई सोबत चुलत मावस बहिणीकडे विवाह समारंभाकरिता आली असता लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दोघी मायलेकी मुक्कामाला थांबल्या असता यावेळी, पीडित मुलीच्या चुलत मावशीने तिला साड्या पाहाण्याकरिता बोलाविले व तिला चहा दिला आणि चहा पिऊन मुलगी मावशीच्या रूममध्ये साड्या पाहायला गेली. त्यावेळी, तिला अचानक चक्कर आली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा न पाहून तिला धक्का बसला.एवढेच नाही तर बेशुद्ध अवस्थेत असताना तिला उघडं करून, एका मुलासोबत झोपलेला व्हिडीओ देखील काढला.
त्यानंतर, तिनं मावशीला याबद्दल विचारणा केली असता, मावशीने तिला तिचे नग्न अवस्थेत मुलासोबत झोपलेले व्हिडीओ आणि फोटो दाखवले. तसेच जर कोणाला याबद्दल सांगितले तर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली. मावशीने आपल्याला चहा मधून गुंगीचं औषध दिलं होतं, हे तिच्या लक्षात आलं. मात्र, मावशीने तिला फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्यामुळे तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. तेव्हापासून त्या मुलीसोबत हा प्रकार वारंवार होऊ लागला. ज्या मुलासोबत मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ तयार केले, त्याने देखील हे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीला वारंवार फोन करून तिच्या गावी जाऊन तिचे शोषण करत होता.
मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले. मावशीने मुलीला चौकात बोलावले होते. मात्र यावेळी धाडस करून मुलीने तिच्या घरच्यांना मावशी देत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. त्यावर आई वडिलांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मावशीला आणि संबंधित मुलाला अटक केली.