राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे ट्विट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आले असून बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची धमकी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पवार यांना धमकीचे ट्विट आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील बंगल्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेनंतर पवार याची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या सुरक्षेची काळजीही पोलिसांकडून घेतली जात असताना आता पवार यांना ट्विटरद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची धमकी पवारांना देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमके काय केले आहे ट्विट?
आता वेळ आली आहे. बारामतीच्या ‘गांधी’ साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची… अशा प्रकारचे ट्विट मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आलेले आहे.