भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईम

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशाचे पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ माजली आहे. एका मेलद्वारे ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आल्या आहेत. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. हा कट उघड होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे ई-मेलरने म्हटले आहे. त्यामुळे हा मेल जर खरा असेल आणि खरंच त्या व्यक्तीने आत्महत्या केली, तर तपास यंत्रणांची डोकेदुखीही आणकी वाढण्याची शक्यता आहे.


हा जो धमकीचा मेल समोर आला आहे, त्यातून अशी माहिती समोर आली आहे की, पीएम मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल सज्ज आहेत. त्यांच्याकडे एकूण 20 किलो आरडीएक्स आरडीएक्स आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना 20 किलो आरडीएक्सने मारण्याचा कट रचला जात होता. सुरक्षा एजन्सी माहिती गोळा करत आहेत की पीएम मोदींच्या हत्येचा कट रचल्याबद्दल आलेला हा मेल कुठून आला आहे? हा मेल पाठवण्यामागे कुणाचा हात आहे. अशा विविध पैलुंची तपासणी सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की त्यांचा नापाक हेतू पूर्ण करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी 20 स्लीपर सेल तयार केले आहेत.

काय म्हणाले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ?
देशाच्या पंतप्रधानांना कोणी धमकी देत असेल तर ते योग्य नाही. हे पत्र महाराष्ट्रातून आहे का? याची चौकशी केली जाईल. त्यानंतर सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.


या ईमेलनुसार मोदींवर हल्ल्याचा प्लॅनही तयार आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशीही संबंध आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना धमकीचे ई-मेल आल्याची माहिती दिली आहे. ज्या मेल आयडीवरून मेल आला आहे त्याचाही कसून तपास करण्यात येत आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेकडे आला आहे, मात्र यात सुरक्षा यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!