तीन लाखांची लाच ; उत्पादन शुल्क विभागातील तिघांवर गुन्हा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तक्रारदाराचे बियर शॉपीच्या लायसन्सचे प्रकरण सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रलंबित होते. हे प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी या कार्यालयातील दुय्यम निरिक्षक दत्तात्रेय विठोबा माकर (वय ५६), जवान नितीन नामदेव इंदलकर (वय ३६) यांनी तीन लाखांची मागणी केली होती.
यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली होती. त्यावरून लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक अशोक शिर्के यांच्या सूचनेनुसार पोलिस निरिक्षक सचिन राऊत, पोलिस नाईक विनाद राजे, विशाल खरात, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांनी सापळा रचला. त्यामध्ये त्यांनी लाचेची मागणी झाल्याची पडताळणी केली.
त्यानुसार या विभागाने संबंधित तिघांविरोधात सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या कामी लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.