भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

आज सर्वपित्री अमावस्या, ज्ञात-अज्ञात पितरांचे श्राद्ध-विधी, शुभ मुहूर्त, महत्व व उपाय

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाला आणि तो आज म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी संपेल. आज सर्वपित्री अमावस्या आहे. तिला भाद्रपद अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात. १६ दिवस चालणाऱ्या पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी ज्ञात-अज्ञात पितरांचे श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केले जाते. यामुळे पितरांची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते आणि सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण अमावस्या तिथीला सर्वपित्री अमावस्या येते. या अमावस्येचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि या दिवशी करावयाचे काही उपाय जाणून घेऊ.

सर्वपित्री अमावस्या मुहूर्त २०२३
सर्वपितृ अमावस्या शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) रोजी रात्री ९.५० वाजता सुरू झाली असून आज म्हणजेच १४ ऑक्टोबरला रात्री ११.२४ वाजता संपेल. कुतूप मुहूर्त सकाळी ११.४४ ते दुपारी १२.३० पर्यंत राहील.

सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व काय?
कोणत्याही महिन्याच्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील कोणत्याही तिथीला व्यक्तीचा मृत्यू झाला तरी पितृ पक्षातील त्याच तिथीला श्राद्ध करण्याची प्रथा आहे. काही लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूची नेमकी तिथी माहीत नसते. अशा स्थितीत या ज्ञात-अज्ञात पूर्वजांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला केले जाते. या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण इ. गोष्टींनी अज्ञात पूर्वजांनाही पितृपक्षात ऐहिक जगात समाधान मिळावे, अशी इच्छा असते. या अज्ञात पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले नाही तर ते निराश होऊन पृथ्वी सोडतात. यामुळे त्यांच्या शापामुळे पितृदोष होतो. कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते. प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. अशा स्थितीत सर्व पितृ अमावस्येला ज्ञात-अज्ञात पितरांचेही श्राद्ध करावे, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

१. सर्वपित्री अमावस्येला तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी, स्नान करून प्रार्थना केल्यानंतर, काळे तीळ, दही, पांढरी फुले आणि पांढरे वस्त्र एखाद्या गरजू गरीब ब्राह्मणाला दान करा. दक्षिणेमध्ये, आपण एखादं भांडं देऊन त्यांचा निरोप घेऊ शकता.

२. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देखील पितरांची शांती होते. सर्व प्रथम स्नान करावे. नंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळांमध्ये पाणी घालावे. संध्याकाळी तिथे दक्षिण दिशेला दिवा लावावा. या दिव्यात मोहरीचे तेल वापरावे.

३. पंचबली कर्माने पितरांना अन्न मिळते. यासाठी गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना अल्प प्रमाणात अन्न द्यावे. असे म्हणतात की आपले पूर्वज देखील या सजीवांच्या माध्यमातून अन्न सेवन करतात.

४. सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केल्यानंतर पितरांना संतुष्ट करण्यासाठी ब्राह्मणांना अन्नदान करावे. ब्राह्मणांच्या भोजनात काळे तीळ, खीर, पुरी, भोपळ्याचे पदार्थ, बार्ली इत्यादी गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे

५. पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गायीला नैवेद्य खाऊ घालू शकता. असे मानले जाते की, पितृपक्षात जर एखाद्या व्यक्तीने गायीला काही खायला दिले तर त्याचे शुभ फळ प्राप्त होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!