भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

टोल टॅक्स आता थेट बँक खात्यातून

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। या वर्षाच्या अखेरीस देशभरात २६ ग्रीन एक्स्प्रेस वे बांधले जातील आणि नवीन टोल नियमही जारी केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनदारकांसाठी दिली. येत्या काही दिवसांत टोल वसुलीसाठी दोन पर्याय देण्याचा सरकार विचार करत आहे. यामध्ये गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे हा पहिला पर्याय आहे. तर दुसरी पद्धत आधुनिक नंबर प्लेटशी संबंधित आहे. सध्या त्यासाठी नियोजन सुरू आहे.

आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही, मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स (Toll Tax) कापला जाणार आहे. त्यासाठी वेगळी कारवाई केली जाणार नाही. आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही, थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

“आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार आहे. २०१९ मध्ये आम्ही एक नियम केला होता की, कार कंपनीने फिट केलेल्या नंबर प्लेटसह येतील. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत आलेल्या वाहनांवर वेगवेगळ्या नंबरप्लेट आहेत”, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. यासोबतच सरकार आता टोल टॅक्स नियमात (Toll Tax Rules) मोठा बदल करण्यात येणार आहे, याचा थेट फायदा
करोडो वाहनधारकांना होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!