TV पाहणं झालं स्वस्त, केबल आणि डीटीएचच्या ग्राहकांना एकाच प्लॅनमध्ये मिळणार १९ रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केबल आणि डीटीएच ग्राहकांसांठी दिलासादाक बातमी असून येत्या काळात तुमचा TV चा रिचार्ज कमी होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन टॅरिफ ऑर्डर २.० मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे आता नवे नियम लागू केले जाणार आहे. या नव्या नियमांनुसार, १९ रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एका प्लॅनमध्ये सामील होणार आहेत.
TRAI चे सचिव, व्ही. रघुनंदन यांनी नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार, सर्व वितरक त्यांच्या पे चॅनेलची किंमत निश्चित करताना, प्लॅन असलेल्या सर्व पे चॅनेलच्या किंमतीवर जास्तीत जास्त ४५ टक्के सूट देण्याची शक्यता आहे.
सध्या फक्त ३३ टक्के सूट दिली जाऊ शकते. ट्रायचे म्हणणे आहे की, पे चॅनलची किंमत वितरकाने दिलेल्या सवलतीवर आधारित असेल. दरम्यान, TRAIचे हे नवीन नियम १ फेब्रुवारी २०२३ पासून लागू होणार आहेत. TRAI च्या मते, टेलिव्हिजन चॅनेलचे सर्व वितरक हे निश्चित करतील की, १ फेब्रुवारी २०२३ पर्यंत, ग्राहकांना प्लॅन किंवा त्यांनी निवडलेल्या चॅनेलनुसार सेवा प्रदान केल्या जातील. शिवाय, वितरक सर्व चॅनेलचे नाव, भाषा, चॅनेलची दरमहा किंमत आणि चॅनेलच्या प्लॅनची रचना आणि किमती मधील कोणत्याही बदलाचा अहवाल १६ डिसेंबर २०२२ पर्यंत देतील.