भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

महाराष्ट्रात दोन सोन्याचे साठे

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्यात सोन्याचे साठे असल्याची माहिती दिल्याने त्या विषयी राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. व्यावसायिक कोळसा खाण लिलाव आणि खाण क्षेत्रातील सोन्यासारख्या संधी या विषयीच्या गुंतवणूक परिषदेत शिंदे बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात कोळसा, बॉक्साईट, लोखंड खानिजासह सोन्याचे साठे असल्याचा केंद्रीय खनन विभागाचा अहवाल आला आहे. त्यासाठी टेस्टिंग सुरु झाले आहे. महाराष्ट्रात सोन्याचे दोन साठे आहेत असे समजल्यावर केंद्राच्या सहकार्याने संशोधन सुरु झाले आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे सोने साठे असू शकतील असे आहेत. पैकी चंद्रपूर वन विभागाच्या संरक्षण क्षेत्रात येते त्यामुळे तेथे खोदकाम होणार नाही. मात्र सिंधुदुर्ग मध्ये खोदकाम होऊ शकणार आहे. शिंदे फडणवीस काळात हे खाणकाम झाले तर महाराष्ट्रासाठी मोठा फायदा होईल असे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!