भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्री गंभीर! मुंबई पोलिसांचीच चौकशी करण्याचा इशारा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। श्रद्धा हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहमंत्री शाह यांनी श्रद्धाने पालघर पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीचा संदर्भ देत मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे.

‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जाचा दाखला देत अमित शाह यांनी मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी श्रद्धा हत्याकांडप्रकरणावर भाष्य केले. ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला सध्याच्या स्थितीत (कायद्यानुसार) कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच, श्रद्धाने पालघर पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीचा संदर्भ देत आफताब तिची हत्या करू शकतो. असे तिने म्हटले होते. तरीही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. असा इशाराही मुंबई पोलिसांना त्यांनी यावेळी दिला.

आफताब श्रद्धाला मारहाण करायचा. नोव्हेंबर २०२० रोजी आफताबला बेदम मारहाण केली होती. यामुळे ती तीन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. या मारहाणीनंतर २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा ने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. आफताब माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकणार आहे, असे या तक्रारीत स्पष्ट लिहिले होते. हा अर्ज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे तकार असूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रद्धाच्या अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी पण…
‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जावर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली होती. मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने ही तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!