भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

डिझेल वाहनां संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना डिझेल वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (SIAM) सोहळ्यात बोलत असताना त्यांनी एक विधान केले आहे. गडकरींनी म्हटलं आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे डीझेल गाड्यांवर अतिरिक्त १० टक्के GST लावण्याची विनंती करण्याचा विचार मी करातोय. डिझेल वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होते आणि रस्त्यावर त्यांची संख्या कमीत कमी असावी अशी सरकारची इच्छा आहे. त्यांच्या या वक्तव्याने डिझेल गाड्या आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.

गेल्या १०-१५ दिवसांपासून मी एक पत्र तयार करुन ठेवले आहे. ते पत्र आज संध्याकाळी निर्मला सीतारामन यांना पाठवणार आहे. यात, डीझेल वाहनांची आणि डीझेलवर चालणाऱ्या सर्व इंजिनावर अतिरिक्त १० टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे, असं नीतिन गडकरी यांनी म्हटलं आहे. डीझेलवर चालणाऱ्या गाड्याची संख्या कमी व्हावी यासाठी १० टक्के जीएसटीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जेणेकरुन डीझेलच्या वाहनांचे निर्माण कमी होऊन प्रदूषण कमी होईल, असंही त्यांनी नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!