भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुन्हा अवकाळी पाऊस ; राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क।राज्याच्या अनेक भागामध्ये थंडीचा कडाका आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्याच्या काही भागात या आठवड्याच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, देशासह राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज शुक्रवारी आणि शनिवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. त्यात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सोबतच राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

मध्य प्रदेशातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुरहानपूर, बरवानी, अलीराजपूर, नीमच, मंदसौर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. रतलाम, शाजापूर, आगर-मालवा, देवास, उज्जैन, अशोकनगर, दतिया, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर. विदिशा, सिहोर, राजगढ, रायसेन, भोपाळ, नर्मदापुरम, हरदा आणि बैतुल येथे वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या सह उत्तर प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील या राज्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!