भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुढील २४ तासांत पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात वादळीवाऱ्या सह पावसाचा अंदाज

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातलं पावसाळी वातावरण निवळेल असा आशावाद निर्माण झालेला असताना आणि भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढच्या २४ तासांत काही ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तर काल विजांसह पाऊस झाला आहे. पण पुढील २४ तासांत कोकणात पुन्हा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखी संकटात जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सापण्याचं संपण्याचं नावचं घेत नाहीय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!