महाराष्ट्र

अवकाळी पाऊस ; पुढील ५ दिवस राज्यात पावसाची शक्यता

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुन्हा एकदा राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात आजपासून पुढील ५ दिवस ढगाळ वातावरण राहिल. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ६ एप्रिल ते गुरुवार ९ एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील बुलडाणा, वर्धा आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्हे यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसून येईल. मुंबईत वातावणात काहीसे ढगाळ दिसून येत आहे.

दरम्यान, २ एप्रिलपासून दुपारच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या १५ दिवसापर्यंत म्हणजे १५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!