भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट,”या” जिल्ह्यात पावसाचा अंदाज

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तापमानाचा पारा घसरला असून हुडहुडी जाणवत आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या २४ तासांत राज्यातील कोकण आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं होतं. या चक्रीवादळाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आता चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण निवळलं असून काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या २४ तासांत केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाचा अंदाज आहे.

दुसरीकडे पर्वतीय भागात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. येत्या आठवड्यात राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढू शकतो. मुंबईत गुलाबी थंडी पडण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईकरांना दिवसा उकाडा जाणवणार आहे. मुंबईच्या किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान १८ ते १९ अंशांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही गारठा हळूहळू वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!