‘ उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है ’ गिरीश महाजन यांच सूचक वक्तव्य
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। “उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है”, महाराष्ट्रात देखील त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील, असं सूचक वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार गिरीश महाजन यांनी केलंय.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पंजाब वगळता बाकीच्या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात नव्या सरकारची स्थापना होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश भाजपामय होईल, असा विश्वास जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील मंत्र्यांपैकी एक म्हणून ख्याती झालेल्या गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या भावी राजकारणाविषयी सूचक वक्तव्य केले. ‘उत्तर प्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असे गिरीश महाजन म्हणाले. पाच राज्यांच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर लवकरच दिसून येतील, असेही गिरीश महाजन म्हणाले.