भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

इंधनावरील व्हॅट कमी करणार, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्यात. इंधन दरवाढीमुळं जनता नाराज होती. त्यामुळं इंधनावरील (fuel) व्हॅट लवकरच कमी करू. कॅबिनेटमध्ये असा निर्णय घेतला जाईल, अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

इंधनावरील कर कमी करणार
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी इंधनावरील केंद्रीय कर कमी केला होता. इतर काही राज्यांनीही व्हॅट कमी केला होता. पण, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारनं पाच पैसे ही इंधनावरील कर कमी केला नव्हता. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. हाय निर्णय शिवसेना-भाजप युतीचा आहे. यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!