पत्रकारांसाठी राज्यसरकार कडून अत्यंत महत्वाची बातमी
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील पत्रकारांसाठी राज्यशासनाकडून अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी असून तुम्ही जर पत्रकार असाल आणि नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी असणाऱ्या शैक्षणिक अर्हतेत बदल केले गेले आहेत. यानुसार शुक्रवारी २१ एप्रिलला शुध्दिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्या नवीन बदलानुसार जर्नालिझम विषयात पदवी तसेच पदविकाधारकांसोबत आता पदव्युत्तर पदवीधारकांनाही अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागातील माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी यासह इतर पदांसाठी एमपीएससीद्वारे ३० डिसेंबर २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द केली गेली होती. मात्र, शैक्षणिक पात्रता अर्हता निकषामुळे अनेकांना अर्ज करण्यात तांत्रिक अडचणी येत होती.मात्र १७ एप्रिलला (सोमवार) ‘डिप्लोमा, डिग्री चालते, मग पोस्ट ग्रॅज्युएट का नाही? ही बातमी आल्यानंतर यामध्ये बदल करण्यात आले. या नुसार राज्य शासनाने शैक्षणिक अर्हतेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये जर्नालिझम विषयात पदव्युत्तर पदवी आणि पदविकासह एकूण १६ अर्हतेचा नव्याने समावेश केला आहे.
याआधी जर्नालिझम विषयात पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येत नव्हता. त्यानंतर १० एप्रिलला नव्याने शुध्दिपत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये पुन्हा मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, फिल्म टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया विषयात पदवी तसेच पदव्युत्तर पदविका आदी १६ प्रकारच्या शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात आल्या आहेत.