गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना करता येणार रिमोट वोटिंगद्वारे मतदान, निवडणूक आयोगाकडून सुविधा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तुमच्या मतदारसंघापासून दूर राहूनही तुमच्या मतदारसंघात मतदान करू शकाल. तेथील निवडणुकीत तुम्ही तुमचे मत देता येणार आहे. त्यामुळे आता नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांमुळे आपल्या गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना रिमोट व्होटिंगच्या सुविधेने दूरवरुन मतदान करता येणार आहे. तसेच स्थलांतरित मतदारांना त्यांच्या घरी किंवा राज्यात मतदानासाठी येण्याजाण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल.
रिमोट वोटिंगच्या सुविधेबाबत राष्ट्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. ही प्रणाली यशस्वी झाली तर, इतर राज्यांत राहात असलेल्या मतदारांना दूर राहूनही आपल्या मतदारसंघात मतदान करता येणार आहे. रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आता कुठेही मतदान करता येणे शक्य होणार आहे. कारण राष्ट्रीय निवडणूक आयोग मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. रिमोट मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आयोगाने तयारी केली आहे. त्यामुळे कुठूनही मतदान करता येणं शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यांकडून याबाबत मतं मागवली आहेत. ३१ जानेवारीपर्यंत लिखित स्वरुपात यावरचं मत राज्यांना द्यायचं आहे. निवडणूक आयोगाकडून १६ जानेवारीला ८ राष्ट्रीय पक्ष आणि ५७ प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे. कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानांवर मागवण्यात आली मते ! भारतीय निवडणूक आयोगाने दूरस्थ मतदान म्हणजेच रिमोट वोटिंग संकल्पनेबाबत निवेदन जारी केले आहे. यामध्ये रिमोट वोटिंग संकल्पना अंमलात आणण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानांवर मते मागवण्यात आली आहेत. रिमोट वोटिंगला मान्यता मिळाल्यास इतर राज्यांत आणि शहरात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.