भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आम्ही बंड नाही उठाव केला…त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आम्ही बंड केला नसून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते,  ते गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. ‘असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या’, त्यावेळी तुम्हाला जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. तसंच, ‘या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

एकनाथ शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. यावर शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावनाला वाट मोकळी करून दिली.

‘आम्हाला जे मिळालं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने केलं आहे. आम्ही बंड केलं नाही तर उठाव केला आहे. आम्ही हिंदुत्त्वाशी तडजोड केली नाही. मला टपरीवर पाठवण्याची धमकी दिली जात आहे. आमचे मुख्यमंत्री हे रिक्षा चालक होते. ज्यांना कुणाला काही करत येत नव्हतं, अशा माझ्या सारखा असंख्य नेते आमदार झाले, ते बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशिर्वादांमुळे झाले आहे, असं पाटील म्हणाले.

आमची अंत्ययात्रा काढली जाणार आहे. पाच आमदार गेले ठीक आहे. 40 आमदार सोडून जात आहे. अरे 25-25 वर्ष आमदार राहिलेले लोक सोडून जात आहे. मंत्रिपद सोडून जात आहे तरी आमची किंमत नाही. तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होतं, या चिमण्यानो परत या, मातोश्रीवर या. या चार कंडोळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

‘अजितदादा म्हणाले, शिवसेना फोडल्यानंतर आमदार निवडून येत नाही. पण आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही सेनेतच आहोत. 55 आमदारांमधून 40 आमदार कसे काय फुटतात, एक जिल्हाप्रमुख फुटणार असं कळलं होतं, त्यावेळी रात्रभर घेऊन त्याला बसलो होतो, त्यावेळी त्याला नको सोडून अशी समजूत काढली होती’असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

‘सगळे आमदार हे आपलं दु:ख सांगण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. साहेब आमची कामं होत नाही, असं सांगत होतो. पण चहापेक्षा केटली गरम होती. या ठिकाणी हा काही लोक बोलले, बंडखोरांनी नजर फिडवण्याची हिंमत नव्हती असे म्हणाले. पण आम्ही जेलमध्ये गेलो आहे. 302 च्या गुन्ह्यात शिक्षा भोगली आहे, तडीपारी होती आमच्यावर, असं असताना शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेतला होता, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांना उत्तर दिलं.

‘तुमची प्रेत बाहेर येईल, तुम्ही डुक्कर आहात, वरळीमधून जाऊ देणार नाही, अशी धमकी देत आहे, पण आम्ही काही लेचेपेचे आमदार नाही. असंच आमदार म्हणून निवडून आलो नाही, हीच आमची निष्ठा, 35-35 वर्ष आम्ही शिवसेनेत घातली आहे. बाळासाहेब हे आमच्या ह्रदयात राहतील. आम्ही योग्यच केलं आहे, भाजप-शिवसेनेची युती राहणार होती, तेच आम्ही केलं आहे, असंही गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलं.

‘शिंदे साहेब गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो.  असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, आमची आजही उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे, त्यांनी आम्हा सर्वांचा विचार करावा, असं भावनिक आवाहनच गुलाबराव पाटील यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!