भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

भोंग्यांच्या आवाजावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी खूप मोठी घोषणा केली. राज्यात कोरोनाचं संकट आता बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये येणारे सर्व सण धुमधडाक्यात साजरी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी अशा सर्व सणांवरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटवले आहेत. पण या सरकारची लाऊडस्पीकरच्या आवाजावर नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला त्यावर त्यांनी दिलेली रिअॅक्शन हेच त्याचं उत्तर होतं, असं तिथे उपस्थित पत्रकारांनी पाहिलं.

राज्यात दोन-तीन महिन्यांपूर्वी लाऊडस्पीकरच्या आवाजाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावरुन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला थेट अल्टिमेटम दिला होता. मशिदींवरील भोंगे नाही उतरले तर त्यासमोर हनुमान चालीसा लावणार, असा इशाराच देण्यात आला होता. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरुन आवाज उठवल्यानंतर देशभरात हा मुद्दा पेटला होता. विशेष म्हणजे भाजपने देखील या मुद्द्याला हात घातला होता. उत्तर प्रदेशमध्ये देखील या मुद्यावरुन प्रचंड पडसाद पडताना दिसले होते. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारनर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता

विशेष म्हणजे महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या लाऊडस्पीकरच्या अल्टिमेटला भाजपकडून पाठिंबा असल्याचंच चित्र होतं. कारण भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडून हनुमान चालीसा वाजवण्यासाठी मोफत लाऊडस्पीकर वाटण्यात येत होते. आता या सगळ्या घडामोडी घडून गेल्यानंतर फार काही उशीर झालेला नाही. पण राज्याच्या राजकीय प्रवासाचं वर्णन केलं तर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. कारण राज्यात सत्तांतर झालं आहे. आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे भाजपचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची भोंग्यांवर नेमकी भूमिका काय ते जाणून घेण्याचा आम्ही आज प्रयत्न केला असता त्यांचं मौन काहीतरी बोलू पाहत होतं.

लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केला. त्यांनी या प्रश्नाला ऐकूनही त्याकडे पद्धतीशीरपणे दुर्लक्ष केलं. पत्रकार लाऊडस्पीकरच्या आवाजाबाबत प्रश्न विचारत आहेत. पण फडणवीस नाही, नाही, असं काहीतरी म्हणत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!