आपलं चित्र हातात घेऊन मुलगी रॅलीत उभं असल्याचं पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले त्या मुलीला
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गुरुवारी छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी एका लहान मुलीने नरेंद्र मोदींचं लक्ष वेधून घेतलं. नरेंद्र मोदी सभेत भाषण करत असताना मुलगी हातात नरेंद्र मोदींचं चित्र घेऊन उभी होती. मुलीने स्वत: हे चित्र साकारलं होतं. मुलगी बराच वेळ उभी असल्याने नरेंद्र मोदी यांनी तिला खाली बसण्याची विनंती केली. “मी तुझं चित्र पाहिलं आहे. तू फार चांगलं काम केलं आहेस,” असं नरेंद्र मोदी तिला म्हणाले.
नरेंद्र मोदींनी यावेळी मुलीला तू जर अशीच उभी राहिलीस तर दमशील असंही आपुलकीने सांगितलं. “तू बराच वेळ झाला उभी आहेस. तू दमशील,” असं नरेंद्र मोदींनी मुलीला सांगितलं. नरेंद्र मोदी यानंतर तिथे उपस्थित पोलिसांना हे चित्र आपल्याकडे घेऊन या अशी विनंती केली. तसंच तिला या चित्राच्या मागे आपला पत्ता लिहिण्यास सांगत, मी तुला पत्र लिहीन असं आश्वासन दिलं. यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवत नरेंद्र मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं.