बारावी च्या ३९६ उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर सापडलेल्या निकालाचे काय झालं? काय निर्णय घेतला बोर्डान
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्य मंडळाचा बारावीचा निकाल आज गुरुवारी जाहीर करण्यात आला . या निकालानंतर हस्ताक्षर बदल झालेल्या त्या विद्यार्थ्यांसोबत काय निर्णय झाला, याची उत्सुक्ता सर्वांना होती. त्यावर बोर्डाने निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. दुपारी २ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. यंद निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 2.97 टक्क्यांनी घट झाली आहे. पण या निकालासोबत अजून एक उत्सुक्ता होती. त्यासंदर्भात बोर्डाने निर्णय घेतला आहे. बारावी भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल झालेल्या त्या सर्व विद्यार्थ्यांचा निकालाबाबत बोर्डाने निर्णय घेतला आहे.
निर्णय काय घेतला
बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळले. एकाच संस्थेच्या दोन कॉलेजकडे या उत्तरपत्रिका गेल्या होत्या. या प्रकरणी मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या हस्ताक्षर बदल झालेल्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने जारी केला आहे.
बोर्ड गुन्हा दाखल करणार
बोर्डाला 396 विद्यार्थ्यांचा उत्तरपात्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आले. यानंतर या प्रकरणी बोर्डाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हस्ताक्षर बदल प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने प्रकरणाचे सर्व धागेधोर उघड होणार आहे.
निकाल कसा दिला
बोर्डाने त्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल दिला आहे. परंतु बदललेले हस्ताक्षर ग्राह्य न पकडता मूळ उत्तरपत्रिकेवरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.