भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आकाशात दिसलेली धावती चमकणारी रेषा नक्की होती तरी काय? ‘त्या’ उडत्या तबकडीचं काय आहे सत्य?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या अनेक भागात काल गुरुवारी संध्याकाळी आकाशात एक वेगळचं चित्र दिसलं. आकाशामध्ये रोज दिसणाऱ्या ग्रह-ताऱ्यांशिवाय एका सरळ रेषेत धावणारी एक वस्तू अनेकांनी पाहिली. ही रेषा पुढे पुढे जात होती, प्रकाशमान रेल्वेप्रमाणे आकाशात उडणारी ही तबकडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी हे चित्र मोबाईलमध्ये कैद केलं. या विषयावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते.आकाशात एक ठिपक्यांची रेषा दिसून आल्याने पृथ्वी वर एलियन आल्याची अफवा उठली.

राज्यभर चर्चेला उधाण आले. आकाशात दिसणारी ही वस्तू धुमकेतू आहे की एखाद्या देशानं सोडलेलं रॉकेट? अशी चर्चा सुरु होती. काही जणांनी तर परग्रहातून एलियन आपल्याशी संपर्क करत आहेत असाही अंदाज बांधला.  एप्रिल २०२२ मध्ये विदर्भातील काही भागात उपग्रहाचे तुकडे पडल्याची घटना घडली होती ती आठवण देखील यामुळे पुन्हा एकदा ताजी झाली. या सर्व चर्चांवर पूर्णविराम देण्यासाठी नागपूर मधील खगोल शास्त्रज्ञ सुरेश चोपणे यांनी या बाबतची अधिकृत माहिती दिली.

२०१९ मध्ये त्याची सुरुवात झाली जगात इंटरनेट प्रोव्हायडर म्हणून हे सॅटेलाइट कामी येतात. ५५ सॅटेलाइटची ही एक मालिका असून एकापाठोपाठ एक ते जात असल्यानं आकाशातून आगगाडी धावत असल्याचा भास होत. हे सॅटेलाईट दोन दिवसापूर्वीच हे लॉन्च झाल्यानं आकाशात दिसतील याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

स्पेस एक्स ही आकाशात पर्यटन कंपनी असून ती टेस्ला कार कंपनी तसेच ट्विटरचे मालक इलान मस्क यांच्या मालकीची आहे. अवकाशात पर्यटन सुरू करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांशी योजनेचा हा एक भाग आहे. विशेष म्हणजे अंतराळात सॅटेलाइट चा प्रचंड कचरा जमा होत असल्याने त्यांच्या या मोहिमेवर जगभरातून टीका केली जात आहे.

आकाशात दिसणारी ही घटना खगोलीय नसून मानवनिर्मित सॅटेलाइटचे भ्रमण आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आणि घाबरून न जाता त्याचा आनंद घ्यावा असे मत खगोल तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी या सर्व चर्चांवर पूर्णविराम देत स्पस्ट केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!