राजकारणात पुन्हा राजकीय उलथापालथ? १३ आमदार आमच्या संपर्कात
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात राजकारणात अनेक वेगवेगळ्या मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू असताना आता नवीन एक बातमी ची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राज्यात गतवर्षी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवाय, निवडणूक आयोगानेही शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्हाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. अशातच आता ठाकरे गटात उरलेले १३ आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय.
राज्यात सर्वच पक्षांकडून मोठमोठे दावे केले जात आहेत. त्या सोबत राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा अनेक चर्चा सुरू आहेत’, असे उदय सामंत म्हणाले. दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार असून, राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून राज्यभरात ‘अजित दादा भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स संपूर्ण राज्यभरात झळकवण्यात आले आहेत.