भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“जो माणूस बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला” एकनाथराव खडसेंचा शहाजीबापूंवर निशाणा

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी एकमेकांवर टीका – टिप्पणी करताना दिसतात आणि त्यासाठी ते संधी शोधात असतात. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ”बायकोला साडी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत” असं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावरूनच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शहाजीबापू यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला आहे.

दरम्यान आपली पूर्वीच्या परस्थितीबद्दल सांगताना, ”बायकोला साडी घ्यायला आपल्याजवळ पैसे नव्हते” असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले होते. ”आपल्या बायकोला जो माणूस साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला” अशा खरमरीत शब्दांत खडसेंनी शहाजीबापू पाटील यांना टोला लगावला आहे.

दरम्यान एकनाथ खडसे म्हणाले की, “शहाजीबापू त्यांच्या पूर्वीच्या परिस्थितीबद्दल सांगताना म्हणले की, त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. असं वक्तव्य शहाजीबापूंनी कदाचित गमतीने किंवा उद्वेगाने केले असेल. जो माणूस आपल्या बायकोला साडीही घेऊ शकत नाही तो मर्द कसला? मात्र शहाजी बापूंनी जे म्हटले आहे ते नेमके कोणत्या हेतूने म्हटले हे मला माहिती नाही. आमदार झाल्यापासून शहाजी बापू पाटील यांची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे शहाजी बापू यांना कोणाकडे आशेने पाहण्याची गरज नाही. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार…’ या डायलॉगमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच त्यांची क्रेझ वाढली. शहाजीबापू पाटील जेव्हा भाषण करतात तेव्हा ते त्यांच्या पूर्वीच्या परिस्थिती बद्दल बोलतात. अशातच ‘बायकोला साडी घ्यायला सुद्धा आपल्याकडे पैसे नाहीत या त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!