भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यभरात कशी असेल ४ ते ५ दिवस पावसाची स्थिती, काय म्हणत हवामान विभाग

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली होती , राज्याचा बराचसा भाग तहानलेलाच होता, त्यामुळे शेतकरी मोठा संकटात सापडला होता. शेतकऱ्यांवर आता दुबार तर काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचा संकट ओढावलेले आहे. असे असताना गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने पुन्हा हजेरी दिल्याचं पाहायला मिळत आहे, परंतु हा पाऊस पुरेसा आहे का?

अशातच पुढील चार-पाच दिवस राज्यातील हवामान कस असेल या बाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून विदर्भातील काही जिल्ह्यात आज अतिवृष्टीच्या इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये ओडिशा किनारपट्टीजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातील व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूरला ऑरेंज तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच पुढील ४ ते ५ दिवस राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असुन काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले, त्याच प्रमाणे पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!