भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयप्रशासन

४ दिवस काम तर ३ दिवस सुट्टीचा नियम कधी लागू होणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नवीन वेज कोड जुलै महिन्यापासून लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आता केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यासंबधी महत्वापूर्ण माहिती दिली आहे.

जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. तुम्हालाच माहितीच असेल की, सरकार लवकरच New Wage Code लागू करणार आहे. हे कोड जुलै पासून लागू होण्याची आशा होती. New Wage Code मध्ये नोकरदारांसाठी ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा नियम असणार आहे.

‘New Wage Code योग्य वेळी लागू केले जातील’
केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांनी New Wage Code वर बोलताना म्हटले की, जवळपास सर्व राज्यांनी ४ श्रम संहितांचा मसूदा तयार केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, योग्य वेळ आली की New Wage Code लागू केले जातील.

नव्या वेज कोडला लागू करण्यात येणार असल्यामुळे याचे थेट परिणाम तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर अर्थात इन हँड सॅलरीवर होणार आहेत. उदाहरणार्थ कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सीटीसीमध्ये मूळ वेतन, एचआरए, निवृत्तीनंतर मिळणारे फायदे (पीएफ, ग्रॅच्युटी आणि इतर) यांची आकडेवारी बदलणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!