खरी शिवसेना कुणाची ? फैसला निवडणूक आयोगाच्या दारात
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेवर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी आपापला हक्क सांगितला आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या आठ तारखेपर्यंत दुपारी एकवाजेपर्यंत कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पक्षातील वादावर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांचे लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर निर्माण झालेल्या शिवसेनेतील पेचप्रसंगावर दोन्ही गटांचे आपापले दावे आहेत. शिंदे गटाला पक्षाच्या ५५ पैकी ४० आमदार आणि १८ लोकसभा खासदारांपैकी १२ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्याचवेळी ठाकरे गटाने पक्षाच्या कार्यकारिणीतून आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रात सध्या जे सरकार स्थापन झालं आहे ते बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या गोष्टीवरती न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्याचबरोबर शिंदे गट आणि शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली आहे. याबाबत खरी शिवसेना कुणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडे कागदपत्रे मागण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात दिलेल्या तारखेच्या आगोदर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कागदपत्रे सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणुक आयोग त्यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.