भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

5G नंतर 4G बंद होणार ? 5G साठी नवीन सिम घ्यावे लागेल का? रिचार्ज किती महाग असेल?वाचा आशा प्रश्नांची उत्तरे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू झाली आहे. Bharti Airtel आणि Reliance Jio ने आजपासूनच काही शहरांमध्ये त्यांची सेवा देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत लोकांना 5G इंटरनेट वापरण्यासाठी नवीन सिम घ्यावे लागेल का? रिचार्ज कितीचे करावे लागेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

2G, 3G आणि 4G नंतर, 5G ही मोबाईल नेटवर्कची 5वी पिढी आहे.


4G नेटवर्क लेगच संपणार नाही. BSNL सारख्या काही सर्विस प्रोव्हायडर्स अजूनही त्यांच्या वापरकर्त्यांना 3G सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे देशातील काही भागात 4G नेटवर्कही कायम राहणार आहे. 5G नेटवर्क पूर्णपणे टेकओवर होईपर्यंत तरी हे सुरुच राहील.

पंतप्रधान मोदींनी शनिवारी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवा सुरू केली. एअरटेलने सांगितले की कंपनी मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करेल. त्याच वेळी, जिओने डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात ते वितरित करण्याची योजना आखली आहे.

5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला नवीन सिम खरेदी करण्याची गरज नाही. 5G स्मार्टफोनच्या कार्ड स्लॉटमध्ये सिम टाकून, तुम्ही 5G सेवा वापरण्यास सक्षम असाल. जर तुमच्याकडे 3G किंवा 4G मोबाईल असेल तर तुम्ही 5G सेवा वापरू शकणार नाही.

4G इंटरनेट सेवेच्या तुलनेत 5G सेवा वापरल्यास तुमचा मोबाईल लवकर डिस्चार्ज होईल, असं तज्ज्ञांचे मत आहे.

Jio, Airtel किंवा कॅबिनेट मंत्रालयाकडून 5G रिचार्ज प्लॅनबाबत आतापर्यंत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की 5G प्लॅनची ​​किंमत 4G प्लॅन सारखीच असेल. प्रीमियम वापरकर्त्यांसाठी काही दिवसांसाठी योजना महाग असू शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!