येत्या काळात सोनं 64 हजारपर्यंत जाणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. 16 जानेवारी रोजी सोन्याचे दर जवळपास 56 हजार 800 पर्यंत पोहोचले. RTGS आणि GST धरुन हे दर 58 हजारांहून अधिक ट्रेड करत आहेत.
येत्या काळात सोनं 64 हजारपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरात इतक्यात घसरण पाहायला मिळेल याची शक्यता कमीच आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार सोन्याचे दर येत्या काळात 64 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी यांच्या मते, यावर्षी सोन्याच्या दरात तेजी कायम राहू शकते. मध्यवर्ती बँकेच्या सोने खरेदीचा सकारात्मक परिणाम सोन्यावर दिसून येणार आहे. अजय केडिया यांनी सांगितले की, 2023 मध्ये सोनं 64,000 रुपयांची पातळी गाठू शकतं.
जर तुम्ही तुमच्या घरात लवकरच लग्न करणार असाल आणि तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे दागिने खरेदी करताना तुम्हाला घाम फुटू शकतो आणि खिशालाही चांगलीच कात्री लागणार आहे. येत्या काळात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात.