भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आता पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा मिळण्याचे संकेत आहे. येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. याविषयी पेट्रोलियम कंपन्यांनी काय संकेत दिले आहेत?

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरु आहे. आज पण डब्लूटीआय क्रूड ऑयलची किंमत ०.०४ डॉलर घसरुण ७२.४९ रुपयांवर पोहचली. तर ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ७६.८७ डॉलर प्रति बॅरलवर पोहचली. कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होऊन गेल्या १३ महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. २२ मे २०२२ रोजी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली होती. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झाला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरवर पोहचले. तेल कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

का होईल पेट्रोल-डिझेल स्वस्त
येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMC) येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करु शकतात. या कंपन्यांच्या तोट्याची भरपाई झाली आहे. तोटा जवळपास भरुन निघल्याने कंपन्या पेट्रोल-डिझेल कपातीचे गिफ्ट देऊ शकतात. गेल्या तिमाहीत या कंपन्यांना जोरदार फायदा झाला. पुढील तिमाहीत जर या कंपन्यांनी जबरदस्त आघाडी घेतली तर किंमतीत कपात होण्याची दाट शक्यता आहे. मार्च महिन्यातील तिमाहीत कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केले होते.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलचा सर्व मिळून निव्वळ नफा ५२ टक्के झाला आहे. कंपनीने मार्च तिमाहीत १०,८४१ कोटींचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीने ७,०८९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने मार्च तिमाहीत ७९ टक्के निव्वळ नफा मिळवला. नफ्याचे गणित पुढील तिमाहीसाठी कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

असा झाला रेकॉर्ड
गेल्या वर्षी २०२२ च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात युक्रेनवर रशियाने हल्ला चढविला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. २००८ नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. त्याचा थेट परिणाम सर्वच देशांवर दिसून आला. श्रीलंकेसह अनेक छोट्या अर्थव्यवस्था भरडल्या गेल्या. या देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या. भारतात तर पेट्रोल १२० लिटरच्या घरात पोहचले. डिझेलमध्ये रेकॉर्डब्रेक उसळी घेतली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!