पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयंनी कमी झाले.
पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या वेळी 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्रातील मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले.
मुंबई – पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करापुणे – पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर
ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीटर
नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर
नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर
औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर
जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर
कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर