पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? कच्च्या तेलाच्या किमतीत दुपटीने वाढ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सौदी अरेबिया जे जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहेत त्यांनी जुलैसाठी आशियाई देशांना विकावयाच्या कच्च्या तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जवळपास दुपटीने वाढ केली आहे. अरब लाईटच्या किमतीतील वाढ अगदीच अनपेक्षित असताना पेट्रोल-डिझेल आणखी महाग होणार आहे.
उत्तर गोलार्धातील बहुतांश देश जुलैमध्ये आपली उन्हाळी मालवाहतूक सुरू करतात. त्यातच सर्वात मोठा तेल आयातदार देश चीन हा आपल्या शांघाय व इतर शहरांतील कोविड-१९ लॉकडाऊन उठविणार आहे. या पार्श्वभूमीवर तेलाच्या मागणीत जुलैमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.त्या मुळे तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते.याचा लाभ सौदी अरेबिया उठवू पाहत आहे.
आशियाई देशांना जुलै मध्ये निर्यात होणाऱ्या अरब लाईट तेलाची अधिकृत किंमत जूनच्या तुलनेत प्रतिबॅरल २.१ डॉलरने वाढविण्यात आली आहे. ओमान आणि दुबईच्या तेलाच्या तुलनेत सौदीच्या तेलाचे दर आता ६.५ डॉलरनी अधिक झाले आहेत. त्या मुळे किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.