पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?कच्च्या तेलाचे दर घटले
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज सलग 13 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत आणि 22 मे पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे संकेत भारतीय बाजारासाठी चांगले असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील दर काय?
महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.
कच्च्या तेलाचे आजचे दर
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 3.30 डॉलर किंवा 2.86 टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रति बॅरल 112 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, बेंचमार्क ब्रेंट क्रूड 3.18 डॉलर किंवा 2.73 टक्क्यांच्या उडीसह प्रति बॅरल 113.1 डॉलरवर व्यापार करत आहे. केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमती स्थिर आहेत.