१४ मार्चला सरकार कोसळणार? “या” नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याचा २०२३-२४ अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एक मोठा दावा करत राजाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचे फुलोरे आणि चुनावी जुमला असल्याचे म्हणत शिंदे-फडणवीस सरकार वर अजित पवार यांनी सडकून टीका केली . तसेच १४ मार्चला सरकार कोसळणार असल्याची भीती असल्याने अर्थसंकल्पात निव्वळ घोषणा करण्यात आल्या असल्याचा दावा ही अजित पवार यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला . त्यांच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत ध्येय सादर करीत अर्थ संकल्प सादर केला आहे. त्यावरून अजित पवार यांनी टीका केली आहे. अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री शब्द बदलून पंचामृत हा शब्द वापरला यावरूनही टीका केली आहे.