भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातल्या व राज्य मंत्रिमंडळातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार? नवीन कुणाला मिळणार संधी?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्याजागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा सरकारचा भर असणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातल्या दोन अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागा या शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळणाऱ्या या दोन जागांमध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद असून त्याजागी कुणाची वर्णी लावायची याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. इतकचं नाही, तर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू होताच भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

शिंदे-फडणवीस तडकाफडकी दिल्लीला
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन आज १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदे पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, दिल्लीत दोघांनाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रात्री उशीरापर्यंत चर्चा झाल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!