भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅक्शनमोडवर…

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या सुनावणीला आता सुरुवात होत आहे. स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहे. या प्रकरणातील सर्व याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी करतील. प्रत्येक आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर त्यावर ते निर्णय देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जलदगतीने होणार आहे. त्यामुळे या आठ दिवसात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असून या सुनावणी कडे सम्पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य लागून आहे.

विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात येत्या १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्वच्या सर्व शिवसेना आमदारांची सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदार आशा सर्वच्या सर्व शिवसेना आमदारांची एकाच दिवशी प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. दिवसभर ही सुनावणी चालणार आहे. साधारण दोन दिवस ही सुनावणी चालेल. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी आलेल्या ३४ याचिकाही निकाली काढणार आहेत. त्यामुळे येत्या १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीत ठाकरे गटाला दिलासा मिळतो की शिंदे गटाला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीवर सर्व शिवसेनेच्या आमदारांचे भवितव्य ठरणार असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही भवितव्य ठरणार आहे. त्याच बरोबर शिंदे सरकारचंही भवितव्य ठरणार आहे. शिंदे गटाकडे पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही याचंही भवितव्य अवलंबून आहे.

शिंदेगटा सोबत ठाकरे गटाचंही भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. या सुनावणीत आमदार अपात्र झाल्यास किंवा आमदार अपात्र नाही झाल्यास पुढील राजकीय गणितं ठरणार आहे. आमदार पात्र-अपात्रतेच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाचा निकालही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!