भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मनसे-भाजप युती होणार? राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा, गडकरी-राज भेट

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा दिला. या भाषणात राज यांनी भाजपवर टीका केली नाही. उलट भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केलं. या घडामोडी घडत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या निमित्ताने मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं.

या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही, असं सांगतानाच मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आम्हाला वाटत होतं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, पण आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. पण वेगळ्या विषयावर भेट होणार आहे. ही भेट राजकीय असणार नाही, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

गडकरी-राज भेट
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. दोन्ही नेत्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र भाजप-मनसे युतीबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लगावले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!