भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

चिंताजनक : कोरोना पुन्हा थैमान घालणार? राज्यात तीन रुग्णांचा मृत्यू

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कोरोना जायचं नावच घेत नाही आहे, देशात पुन्हा एकदा करोना (Covid) थैमान घालणार का अशी भीती आता निर्माण झाली आहे. कारण म्हणजे तब्बल तीन वर्षांनी करोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. देशात शुक्रवारी तब्बल 1590 करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या 146 दिवसांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितलं आहे. यासह देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 8601 झाली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील तीन मृत्यू महाराष्ट्रात झाले असून इतर तीन मृत्यू कर्नाटक, राजस्थान आणि कर्नाटकात झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 10 रुग्ण करोनातून बरे झाल्याची नोंद झाली आहे. यासह उपचारानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,62,832 वर गेली आहे. रिकव्हरी रेट सध्या 98.79 टक्के इतका आहे. तर मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. तसंच रोजचा पॉझिटिव्हिटी रेट 1.33 टक्के आणि आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.23 टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रायलाच्या माहितीनुसार, देशभरात करोनाचे एकूण 220.65 कोटी डोसेस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 19 हजार 560 करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतचा आकडा 92.8 कोटी इतका आहे.

सर्व राज्यांसाठी सूचना
करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. ओमायक्रॉनचा XBB.1.16 सब-व्हेरियंट हा देशात प्रभावशाली असू शकतो. पण रुग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांनी करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी चाचणी, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि नियमांचं पालन करावं असा सल्ला दिला आहे. करोनाशी लढण्यासाठी कितपत तयारी केली आहे याचा आढावा घेण्यासाठी आम्ही मॉक ड्रिल करणार आहोत. हे मॉक ड्रील तुमच्या राज्यात-केंद्रशासित प्रदेशात कधीही केलं जाऊ शकतं असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. “रुग्णालयात भर्ती होणाऱ्यांची संख्या वाढल्याचा कोणताही पुरावा सध्या नाही आहे. पण तरीही पूर्वकाळजी घेणं वाढलं पाहिजे. सर्व गंभीर तीव्र श्वसन आजार (Sari) चाचणी करणं आवश्यक आहे”, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. देशातील करोना स्थितीचा आणि वाढत्या रुग्णसंख्येचा यावेळी आढावा घेण्यात आला.

आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

  • आजारी असणाऱ्यांनी तसंच वृद्धांनी गर्दीची आणि मोकळी हवा नसणारी ठिकाणं टाळा
  • डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि इतर आरोग्य सेवा तसेच रुग्ण आणि त्यांचे परिचारक यांनी मास्क परिधान करणे.
  • गर्दीच्या आणि बंद ठिकाणी मास्क घालणे
  • शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू वापरा
  • हाताची स्वच्छता राखणे आणि वारंवार हात धुणे
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
  • चाचणीला प्रोत्साहन देणे आणि लक्षणे लवकर कळवणे
  • श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असल्यास इतरांशी संपर्क मर्यादित करणे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!