महाराष्ट्रात आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कमी झाल्यामुळे नुकतेच सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशावेळी चिंता करायला लावणारी एक बातमी समोर आलाय. महाराष्ट्रात कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आलाय.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच त्याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील सांताक्रुझमध्ये हा रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील लॅबमध्ये रुग्णाच्या नमुन्यांची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, XE व्हेरिएंटमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याचं पत्र देण्यात आलंय. महाराष्ट्रात खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्रानं दिल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.