भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

कृषीमंत्री अब्दुल सत्तार गंदी नालीचा XX : शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची जीभ घसरली

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याचे कृषिमंत्री शिंदे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची जीभ घसरली.

अब्दुल सत्तार यांनी मला सल्ला देण्याची गरज नाही. अब्दुल सत्तार हा गंदी नालीचा XX आहे, असं बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख म्हणाले. पारसची घटना घडली तेव्हा मी तिथंच होतो. गारपीट झाली तिथं मी गेलो होतो. सत्तार यांना सल्ला द्यायचाच असेल तर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा. कारण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज त्यांची आहे. पारसची दुर्घटना घडली तेव्हा त्यांचं कर्तव्य होतं. अमरावतीला आले पण फडणवीस इथं आले नाहीत, असंही नितीन देशमुख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!