तुम्ही चिकन खातायं! मग ही बातमी वाचाच… चिकनच्या डिशमध्ये निघाले उंदराचे मांस
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन (chicken) आणि मटणाच्या डिशमध्ये उंदराचे मांस (Rat meat) आढळल्याची घटना घडली. त्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. १४ ऑगस्टला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ढाब्याचा मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिक्वेरा (वय ४० वर्षे) आणि सदर हॉटेलचे आचारी तसेच चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
एफआयआर नुसार, १३ ऑगस्ट रोजी अनुराग सिंग (वय ४० ) हे त्यांचा मित्र अमित सोबत बांद्रा पश्चिम येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी रोटीसोबत चिकन आणि मटणाची थाळी ऑर्डर केली. जेवताना त्यांना त्यामध्ये एक मांसाचा तुकडा समोर आला जो वेगळा दिसत होता. जवळून तपासणी केल्यावर तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये भा द वि कलम २७२ (विक्रीच्या उद्देशाने अन्न किंवा पेय पदार्थात भेसळ करणे), ३३६ (जीवन धोक्यात आणणारे कृत्य) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
जेवणाचा काही भाग खाल्ल्यानंतर अनुराग सिंग त्यांचा मित्र अमित यांना चिकनच्या जिशमध्ये काहीतरी गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर प्लेटमध्ये निरखून पाहिलं असता ताटात जरा वेगळा मांसाचा तुकडा दिसला. त्यानंतर जवळून तो तुकडा बघितला असता, ते मांस उंदराचे असल्याचे लक्षात आले, हे पाहून अनुराग सिंग आणि अमित यांना धक्काच बसला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत