तुम्ही मोबाईल वापरतायं,१ जानेवारी पासून होणार हे ५ महत्वाचे मोठे बदल
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तुमच्या कडे मोबाईल आहे, आणि तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण १ जानेवारी २०२४ पासून ५ मोठे बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम मोबाईल वापरकर्त्यांना होणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर पूर्वी सर्व कामे पूर्ण करा. अन्यथा तुम्ही मोबाईल फोनद्वारे UPI पेमेंट करू शकणार नाही. त्याचप्रमाणे सिम कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते. म्हणजे एक प्रकारे तुमचा फोन एक बॉक्स बनेल.
तुम्ही UPI पेमेंट करू शकणार नाही
एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI आयडी वापरला नसल्यास. तुमचा UPI आयडी ३१ डिसेंबर २०२३ नंचक निष्र्किय केला जाईल. याचा अर्थ १ जानेवारी २०२४ पासून तुम्ही UPI पेमेंट जसे की google pay, phone pay आणि paytm वापरू शकणार नाही. मात्र हे टाळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत UPI आयडी ब्लॉक केला जाईल.
नवीन सिम कार्डचे नवीन नियम
नवीन वर्षापासून UPI सिम कार्ड मिळणे कठीण होणार आहे, कारण सरकार नवीन नियम लागू करत आहे, त्यामुळे नवीन सिम घेताना बायोमेट्रिक तपाशील द्यावा लागणार आहे. हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेने मंजूर केले आहेत. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.
बंद केली जाणार Gmail Account खाती
Gmail खाती १-२ वर्षापासून वापरली गेली नाहीत. अशी गुगल सर्व Gmail Account बंद करणार आहे. नवीन नियम वैयक्तिक Gmail खात्यांना लागू होणार आहे. तर नवीन नियम शाळा आणि व्यावसायिक खात्यांना लागू होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही जुने Gmail खाते वापरले नसेल तर ते अॅक्टिव्ह ठेवावे.
लॉकर चा करार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लॉकर कराराचं नूतनीकरण ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन लॉकर नियम नवीन वर्षापासून लागू केला जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत मंजुरी द्यावी लागेल. अन्यथा तुम्ही लॉकर वापरू शकणार नाही.
डिमॅट खातेधारकाला (Demat account) ३१ डिसेंबरपर्यंत नॉमिनीची माहिती अपडेट करावी लागेल. यापूर्वी त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर होती, ती तीन महिन्यांनी वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा