भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

नितीन गडकरींची भन्नाट आयडिया, पेट्रोल, डिझेल ऐवजी आता ‘या’ इंधनावर धावणार गाड्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। देशात दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. परंतु आता पेट्रोल आणि डिझेलची गरज लवकरच संपणार आहे. कारण पेट्रोल-डिझेलऐवजी इथेनॉलवर आता गाड्या धावणार आहेत. सरकराने कार कंपन्यांना यासाठी तयारी करण्यास सांगितले असून याबाबत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

सरकारने फ्लेक्स इंजिन असलेल्या वाहनांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. यामध्ये वाहन कंपन्यांना सहा महिन्यांत फ्लेक्स फ्लुएल इंजिन असलेली वाहने बाजारात आणण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

फ्लेक्स इंजिन सुरू केल्यामुळे १०० टक्के इथेनॉलवर ही वाहने चावलणे शक्य होणार आहे. देशातील अनेक भागांत डिझेल आणि पेट्रोलचे दर १०० च्या पुढे गेले आहेत. इथेनॉलची किंमत सध्या ६३.४५ रूपये प्रतिलिटर आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इथेनॉल ४० रूपयांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत इथेनॉल ५० टक्के कमी प्रदूषण पसरवते.

फ्लेक्स इंधन इंजिन असलेली वाहने सादर करण्यास संमती
दरम्यान, काही कंपन्यांनी फ्लेक्स इंधन इंजिनसह वाहने तयार करण्यास सुरूवात केली आहे. तर अनेक कंपन्यांनी देखील ते स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. टीव्हीएस या कंपनीने २०१९ मध्ये भारतात प्रथमच फ्लेक्स इंजिन इंधन सादर केले होते. तसेच टोयोटो, मारूती सुझुकी आणि ह्यंदाई यांसारख्या कंपन्यांना फ्लेक्स इंधन इंजिन असलेली वाहने सादर करण्यास संमती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!